NTC - Agriculture Gypsum , Adgaon, Nashik

Share this:

Like this:

शेतात कृषी जिप्समच्या वापरामध्ये लक्षात घेण्यासारख्या गोष्टी:

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे, पानांवरील वाढणार्‍या वरचा पिवळसर भाग गुंडाळलेला आणि अरुंद होत जातो .

अत्यधिक कमतरता झाल्यास वनस्पतींची वाढ रोखली जाते आणि वाढ खुंटते जी जिप्सम टाकून पूर्ण केली जाऊ शकते.

जिप्सम हा एक चांगला भू सुधारक आहे, जो क्षारीय माती सुधारण्याचे कार्य करतो.

जिप्सम अम्लीय मातीमधील अल्युमिनियमचे हानिकारक प्रभाव कमी करते. पिकांचे उत्पादन आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी जिप्समचा वापर केला जातो.

शेतात कृषी जिप्सम कधी आणि कसा वापर करायचा ?

पेरणी करण्यापूर्वी जिप्सम मातीत मिसळला जातो. जिप्सम घालण्यापूर्वी,शेताची पूर्ण तयारी करून जिप्सम पीसून घ्या

दीर्घ मुदतीच्या काही पिकांसाठी खोल नांगरट करावी

त्यानंतर जिप्सम हलके हलवून जमिनीत मिसळा.

कृषी जिप्समच्या वापरामध्ये लक्षात घेण्यासारख्या गोष्टी:

1) उच्च आर्द्रता असलेल्या जिप्समला ओल्या ठिकाणी ठेवू नका जमिनीच्या वर ठेवा.

2) माती परीक्षणानंतर जिप्सम योग्य प्रमाणात घाला.

3) जोरदार वारा वाहतो तेव्हा जिप्सम शेतात फोकवू नका.

4) जिप्सम घालण्यापूर्वी, त्यात ढेकळे असल्यास, बारीक करा.

5) जिप्सम टाकतांना हात कोरडे असले पाहिजेत.

6) संपूर्ण शेतात जिप्सम बुरकाव समान रीतीने झाला पाहिजे .

7) जिप्सम टाकल्यानंतर मातीमध्ये चांगले मिसळा.

8) मुलांना जिप्सम पासून दूर ठेवा.

Leave a Reply

Share this:

Like this:

Scroll to Top